Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज फ्लॅटमध्ये वडील आणि मुलाचा मृत अवस्थेतील मृतदेहः पुण्यातील नन्हे गावातील घटना; परिसरात...

फ्लॅटमध्ये वडील आणि मुलाचा मृत अवस्थेतील मृतदेहः पुण्यातील नन्हे गावातील घटना; परिसरात खळबळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील नन्हे गाव परिसरात व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेजवळ एका सोसायटीमध्ये राहत असलेल्या फ्लॅटमध्ये वडील आणि मुलाचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी जाऊन त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर दोघांचे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

अरुण पायगुडे (वय 64 ) आणि ओमकार पायगुडे (वय 32) अशी मृतदेह मिळून आलेल्या पिता पुत्राचे नाव आहे. याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी माहिती दिली की, मयत अरुण पायगुडे हे रेल्वेतून निवृत्त होऊन मुलासह नन्हे परिसरात राहण्यास होते. त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले असून ती सासरी राहण्यास आहे तर काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यामुळे संबंधित घरामध्ये मयत पिता पुत्र हे दोघेच राहण्यास होते. दोन वर्षांपूर्वी ओमकार पायगुडे याचा मोठा अपघात झाला होता यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची मानसिक स्थिती बिघडलेली होती. त्यामुळे तो विचित्र वागत असल्याने घरातच बहुतांश वेळ असे. सदर पिता पुत्रास दारू पिण्याचे देखील व्यसन होते त्यामुळे ते रोज दारू पीत बसत असे. सदर सोसायटीचा सुरक्षारक्षक पायगुडे यांच्या घरी कचरा घेण्यासाठी बुधवारी रात्री गेला होता. त्यावेळी त्याने आवाज देऊ नये ही घरातून कोणी बाहेर आले नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा ढकलून उघडून पाहिले असता, घरातील बेडवर सदर दोघे निपचित पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती सिंहगड रोड पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. सदर मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात अंत्यसंस्कारासाठी गुरुवारी देण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहे.

 

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments