Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजफ्रेंडशिप डे'लाच काळाचा घाला; माळशेज घाट फिरायला गेलेल्या मित्रांच्या कारला अपघात

फ्रेंडशिप डे’लाच काळाचा घाला; माळशेज घाट फिरायला गेलेल्या मित्रांच्या कारला अपघात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : माळशेज घाटावर फिरायला गेलेल्या पाच मित्रांवर काळाने घाला घातला आहे. सुट्टी असल्याने पाच मित्र रविवारी कारने माळशेज घाटात फिरण्यासाठी गेले होते. मात्र, परत येत असताना गडीवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे. तर इतर तिघे जखमी झाले आहेत. रविवारी (दि. ०४) माळशेज घाटातल्या भोरांडे गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे.

नरेश म्हात्रे (वय-३१, रा. चिंचपाडा), अश्विन भोईर (वय-३०, रा. वरप), प्रतीक चोरगे (वय-२१, रा. गोवेली) अशी या आपघतात मृत्यू झालेल्या तीन मित्रांची नावे आहेत. तर अक्षय मोंडुले (रेवती पाडा), शिवाजी घाडगे (रेवती पाडा), वैभव कुमावत अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माळशेज घाटात मुरबाड तालुक्यातील कल्याण मुरबाड माळशेज महामार्गावर कासार पुला जवळ वळणाचा अंदाज न आल्याने कार झाडावर आदळली. या अपघात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुर्घटनेतील मृत व जखमी सर्व कल्याण व रेवती येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रात्रीच्या वेळी माळशेज घाटातील रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगातील कार एका झाडावर जोरदार आदळल्याने अपघात झाला आहे. हे सर्व मित्र माळशेज घाटात फिरायला गेले होते. त्यानंतर ते भीमाशंकरला देवदर्शनासाठी जात होते. मात्र, वाटेतच त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments