Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजफोन करून भेटायला बोलवायचा, जर तरुण आला नाही, तर मैत्रिणीला बोलवू का...

फोन करून भेटायला बोलवायचा, जर तरुण आला नाही, तर मैत्रिणीला बोलवू का म्हणायचा; जोडप्याला ब्लॅकमेल करणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसर हा उच्चभ्रूचा परिसर म्हणून परिचित आहे. या भागातील एका हॉटेलमध्ये आलेल्या जोडप्याची माहिती हॉटेलमधून परस्पर घेऊन पोलीस कर्मचाऱ्याने जोडप्याला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.

पोलीस हवालदार संदीप वसंत शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात शिंदे हे गुप्त माहिती विभागात नेमणुकीस होते. परेदशासह इतर राज्यातील, शहरातील नागरिक, तरुण-तरुणी आणि नोकरदार वर्ग कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेलमध्ये कामानिमित्त राहण्यास येतात. दरम्यान काही दिवसांपूर्वी एक जोडपे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यास आले होते. नियमानुसार हॉटेलचालकांकडून संबंधित जोडप्यांची माहिती, कागदपत्रे आणि मोबाईल क्रमांक घेतला गेला.

जोडपे हॉटेलमध्ये राहून गेल्यानंतर माहितीचा फायदा घेत शिंदेने त्यांचे मोबाईल क्रमांक, इतर कागदपत्रे हॉटेलमधून मिळवली. त्यानंतर १९ जुलैपासून संदीप शिंदे याने तरुणाला फोन करून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. शिंदे त्यांना भेटायला बोलावत असत. तसेच त्यांना सतत मेसेज करत होता. जर तरुण आला नाही, तर त्यांच्या मैत्रिणीला बोलवू का, असे म्हणत त्रास देत असे.

या प्रकारानंतर संबंधित तरुणाने कोरेगाव पार्क पोलिसांत धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीची चौकशी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी केली. या चौकशीमध्ये शिंदे याने हॉटेलात जाताना किंवा तेथून आल्यानंतर त्याची नोंद पोलीस ठाण्यात केली नाही. तसेच, त्याबाबत वरिष्ठांनाही कोणतीही माहिती दिली नसल्याचे समोर आले. या प्राथमिक चौकशीची माहिती संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पोलीस हवालदार संदीप वसंत शिंदे यांचे निलंबन केले आहे. हातात त्यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments