इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, ता. 2: फॉर्च्यूनर गाडी शिकवताना पाण्याच्याटाकीला धडकल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पालखी स्थळाच्या परिसरात आज बुधवारी (ता.2) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालखी स्थळावर एकाला फॉर्च्यूनर गाडी शिकवीत होते. त्यावेळी गाडीमध्ये दोघेजण होते. शिकाऊ चालक गाडी चालवित असताना, त्याच्यासमोर अचानक एक दुचाकी आली. तेव्हा चालकाने ब्रेक दाबण्याच्या ऐवजी एक्सलेटर वर पाय दिला. आणि गाडी सरळ जाऊन पाण्याच्या टाकीच्या पाईपला धडकली. यावेळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दरम्यान, या अपघातात टाकीचा पाईप तुटून मोठे नुकसान झाले आहे. तर टाकीच्या पाईपामध्ये गाडी अडकल्याने गाडी काढण्यासाठी तब्बल अर्धा तास वेळ लागला. या घटनेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात टाकीचा पाईप तुटल्याने पाणी पुरवठा करता येणार नाही. अशी माहिती मिळत आहे.