Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज फॉरेक्स ट्रेडिंग गुंतवणुकीचा बहाणा: 20 जणांची सव्वा तीन कोटीची फसवणूक; भारती पोलिस...

फॉरेक्स ट्रेडिंग गुंतवणुकीचा बहाणा: 20 जणांची सव्वा तीन कोटीची फसवणूक; भारती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

फॉरेक्स ट्रेडींगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सव्वा तीन कोटींची 20 हून अधिक जणांची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातही जणांवर फसवणूक, अपहार, संगणमत करणे त्याबरोबरच महाराष्ट्रातील ठेवीदारांची हितसंरक्षण कायद्याच्या (एमपीआयडी) विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत तुकाराम मोरे (रा. गांधीनगर, सातारा), नामदेव अंकुश गायकवाड, राजश्री रामचंद्र रस्ते (रा. कोळकी, सातारा), अनिल चव्हाण, रूपाली अनिल चव्हाण (रा. मुनानगर, सातारा), शशिकला मारूती वादगावे आणि सुरेश गोरख कुंभार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिगंबर पोपट गायकवाड (38, रा.) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै 2021 ते ऑक्टोबर 2022 दरम्यान कात्रज येथील दोन हॉटेलमध्ये व डेक्कन येथील एका हॉटेलमध्ये घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांना आरोपी नामदेव गायकवाड आणि रस्ते यांनी फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास 20 टक्के रक्कम परतावा मिळेल असे आमिष दाखविले. गायकवाडयांचा विश्वास संपादन करून त्यांना फॉरेक्स ट्रेडिंग बाबत माहिती दिली. तसेच इतर आरोपींसोबत ओळख करून दिली. आरोपी हे क्रिएशन ट्रेडर्स अॅण्ड डेव्हलपर्स एलएलपी या कंपनीचे मालक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर फिर्यादी गायकवाड यांनी नामदेव गायकवाड याच्याकडे दहा लाख रूपये रोख व क्रिएशन डेव्हलपर्सच्या नावे 10 लाख व नंतर 2 लाख 85 हजार जमा केले. सुरूवातील त्याना परतावा दिला. त्यानंतर इतरांनीही मिळून 3 कोटी 25 लाख 8 हजार रूपये आरोपींना दिले. मात्र त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याने व फसवणूक झाल्याने त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments