Saturday, July 12, 2025
Homeक्राईम न्यूजफेसबुक कांडमध्ये फसला सरकारी अधिकारी; तरुणीने घातला तब्बल 'इतक्या' लाखांचा गंडा; आयुष्य...

फेसबुक कांडमध्ये फसला सरकारी अधिकारी; तरुणीने घातला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा गंडा; आयुष्य संपवलं

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नाशिक : राज्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नुकतीचं एका निवृत्त अधिकाऱ्याची ७० लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा एआयच्या मदतीने चेहरा वापरून ही फसवून करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

याचदरम्यान, आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका कृषी अधिकाऱ्याला ऑनलाइन ५५ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या घटनेत कृषी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचं देखील समोर आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

नाशिमधील प्रशांत पाटील यांनी फसवणुकीतून आत्महत्या केली आहे. प्रशांत हे जव्हार पंचायत समितीचे कृषी अधिकारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांची फेसबूकवर एका तरुणीशी ओळख झाली होती. ते नेहमी गप्पा मारायचे. एक दिवस या तरुणीने प्रशांत यांना ऑइल स्वस्तात खरेदी करून महागात विक्रीचे अमिष दिले होते.

प्रशांत पाटील हे त्या महिलेच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी ३० तोळे दागिने विकून कर्ज काढून रक्कम जमा केली. या महिलेच्या नादात त्यांनी तब्बल ५५ लाख रुपये गमावले. ऐवढे पैसे गमावल्याचे लक्षात येताच त्यांनी चिंतेत येऊन आयुष्य संपवले. याप्रकरणी प्रशांत यांची पत्नी यांनी नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments