Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढून तरुणीवर बलात्कारः रिलेशन मध्ये रहा, अन्यथा फोटो व्हायरल...

फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढून तरुणीवर बलात्कारः रिलेशन मध्ये रहा, अन्यथा फोटो व्हायरल करण्याची धमकी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढवून त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन चंदर मुट्टल (रा. मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार १ जानेवारी २०१६ ते ८ जानेवारी २०२४ दरम्यानच्या काळात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणीची आणि आरोपी चेतनची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. यानंतर आरोपीने चेतनने तरुणीला प्रेमाच्या जाळयात ओढून लग्नाच्या आमिषाने लोणावळा, हडपसर, वडकी, कोरेगाव पार्क परिसरात शारीरिक संबंध ठेवले. तसेच फिर्यादी यांच्याशी लग्न करतो असे सांगून दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले करत आहेत.

रिलेशन मध्ये रहा, अन्यथा फोटो व्हायरल करण्याची धमकी

तरुणीला रिलेशनशिप मध्ये राहा अन्यथा दोघांच्या फोटो सोशल मीडियावर करण्याची धमकी देत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वडगाव शेरी येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष धोंडीराम कोलते (वय-३०, रा. क्रांतीनगर, छत्रपती शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना शास्त्रीनगर येरवडा येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी आशिष कोलते आणि फिर्यादी या एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांचे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. दोघानींनी एकमेकांसोबत फोटो काढले होते. यानंतर फिर्यादी या शिक्षणासाठी पुण्यात आल्या होत्या. आरोपीने फिर्यादी यांना मोबाईल मधील फोटो दाखवून ‘जर तू माझ्या बरोबर रिलेशन मध्ये राहिली नाही तर मी हे फोटो सोशल मीडियावर व्हरायल करेल’ अशी धमकी दिली तसेच दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments