इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
‘व्हॅलेंटाईन डे’ हा तरुण अथवा तरूणी यांच्यामध्ये एक वेगळंच आकर्षण निर्माण करतो. त्यामुळे फेब्रुवारी महिना सुरु झाला की लगेच या दिवसाची चाहूल लागते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या 7 दिवसअगोदरच याची तयारी सुरु केली जाते. त्यानुसार, विविध डेज् सेलिब्रेट केले जातात. आत्तापर्यंत रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे हे डेज् सेलिब्रेट केले गेले आहेत.
गेल्या तीन दिवसांत हे डेज़ सेलिब्रेट करण्यात आले. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेम आणि रोमान्ससाठी ओळखला जातो. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा कपल्ससाठी खूप खास दिवस असतो. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘व्हॅलेंटाईन वीक’ सेलिब्रेट केला जातो. ‘व्हॅलेंटाईन वीक’ 7 दिवस चालतो, शेवटचा दिवस व्हॅलेंटाईन डे असतो. आज ‘टेडी डे’ आहे. टेडी डे दरवर्षी 10 फेब्रुवारीला सेलिब्रेट केला जातो. ‘टेडी डे’च्या दिवशी, कपल्स एकमेकांना टेडी बेअर्स गिफ्ट करतात.
तर 11 फेब्रुवारीला ‘प्रॉमिस डे’ आहे. ‘प्रॉमिस डे’च्या दिवशी, कपल्स आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात. तर 12 फेब्रुवारीला ‘हग डे’ सेलिब्रेट केला जातो. या दिवशी कपल्स एकमेकांना मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करतात. इतकेच नाहीतर 13 फेब्रुवारीला ‘किस डे’च्या सेलिब्रेट केला जातो. तर ‘व्हॅलेंटाईन डे’ हा दिवस 14 फेब्रुवारीला सेलिब्रेट केला जातो. या दिवशी गिफ्ट कार्डस आणि विशेष सरप्राईज देऊन कपल्स त्यांचे प्रेम व्यक्त करतात.