Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजफुटबॉल आणण्यासाठी गेलेल्या मुलीवर बलात्कारः मुलगी 28 आठवड्यांची गर्भवती राहिल्यावर प्रकार उघड,...

फुटबॉल आणण्यासाठी गेलेल्या मुलीवर बलात्कारः मुलगी 28 आठवड्यांची गर्भवती राहिल्यावर प्रकार उघड, गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

फुटबॉल खेळत असताना बॉल झुडपात गेल्यानंतर तो शोधण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयीत आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पिडीत मुलगी 28 आठवड्यांची गर्भवती राहिल्याने वानवडी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मुकेश कुमार मुखीया (22, रा. डिफेन्स कॉलनी, लुल्लानगर, वानवडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत घटनेच्या वेळी अल्पवयीन व सध्या 18 वर्षाच्या असलेल्या तरूणीने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सहा महिन्यांपूर्वी पिडीता अल्पवयीन असताना ती मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना बॉल मैदानाशेजारील झुडपात गेला. त्यावेळी पिडीता बॉल शोधण्यासाठी झुडपात गेली. त्यावेळी तेथे आलेला मुकेश तिच्या पाठोपाठ झुडपात गेला. त्यानंतर तिथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान, पिडीता ही गर्भवती असल्याचा प्रकार तिच्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये तिने मुकेश याने अत्याचार केल्याचे सांगितले. त्याने केलेल्या अत्याचारामुळे सध्या पिडीता ही 28 महिन्यांची गर्भवती राहिली. त्यामुळे आरोपीवर बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार समोर आल्यानंतर 22 वर्षीय तरूणावर बलात्कार तसेच पॉस्कोच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे वडील लष्करात नोकरीला असून त्यांची बदली झाल्याने संपूर्ण कुटुंब बिहार येथे गेले आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी या प्रकरणी दिली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments