Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजफायनान्सची वसुली करणाऱ्यांकडून रिक्षा चालकाला मारहाणः भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा...

फायनान्सची वसुली करणाऱ्यांकडून रिक्षा चालकाला मारहाणः भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

फायनान्सचे बाऊन्सिंग चार्जेस भरले नसल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी रिक्षा ताब्यात मागितली. त्यावेळी रिक्षा देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षा चालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली.

याप्रकरणी युवराज ज्ञानोबा साष्टे (30, रा. बेनकर वस्ती, धायरी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून साईनाथ चव्हाण व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुणे-सातारा रोडवरील गुजरवाडी फाटा येथे शुक्रवारी (दि.23) दुपारी दोनच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साष्टे हे रिक्षा चालक आहेत. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ते गुजरवाडी फाटा येथे रिक्षा घेऊन थांबले होते. त्यावेळी कात्रज येथील व्ही के इंटरप्रायजेसचे साईनाथ चव्हाण व दोन जण त्याठिकाणी आले. फायनान्स कंपनीला दिलेले चेक बाऊन्स झाल्याने बाऊन्स चार्जेस फिर्यादी यांनी भरले नसल्याने आरोपींनी रिक्षा ताब्यात मागितली.

साष्टे यांनी रिक्षा ताब्यात देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपींनी साष्टे यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. साईनाथ चव्हाण याने लोखंडी वस्तूने साष्टे यांच्या डोक्यात मारून जखमी केले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस फौजदार एस आखुटे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments