Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज फळ व्यवसायात गुंतवणूक करण्याचा बहाणाः 6 जणांची तब्बल 70 लाख रुपयांची...

फळ व्यवसायात गुंतवणूक करण्याचा बहाणाः 6 जणांची तब्बल 70 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक, पुण्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

फळ व्यवसायाच्या अल रुमान एंटरप्रायझेस नावाच्या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 8 ते 9 टक्के दराने परतावा देतो असे सांगून विविध गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याचे अमिष दाखविण्यात आले. सदर गुंतवणुकीवर विश्वास ठेऊन गुंतवणूक केलेल्या 6 जणांची तब्बल 70 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सलमान इम्तियाज शिरोळकर (वय-40, रा. कोंढवा, पुणे) या आरोपीवर कोंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत सलीम कासम शेख (वय-69, रा. कोंढवा, पुणे) यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 28/7/2021 ते एप्रिल 2023 दरम्यान घडलेला आहे. तक्रारदार सलीम शेख हे आरोपी सलमान शिरोळकर यांच्या ओळखीचे आहेत. तक्रारदार व इतर गुंतवणूकदार यांना आरोपीने त्याचे फळ व्यवसायाच्या अल रुमान एंटरप्रायझेस या कंपनीत पैसे गुतंवणूक केल्यास दरमहा 8 ते 9 टक्के परतावा देतो असे अमिष दाखवले. तसेच त्याबाबत करारनामा करुन देऊन तक्रारदार यांच्याकडून 28 लाख रुपये घेण्यात आले.

अशाचप्रकारे मोहम्मद नूर अहेमद मेमन यांच्याकडून 3 लाख रुपये, असिफ शेख पठाण यांचेकडून साडे 4 लाख रुपये, तस्लीम त्नवीर शेख यांच्याकडून 7 लाख रुपये, शेख रेश्मा उमर यांच्याकडून 3 लाख, तर आयेशा अली याकूब यांच्याकडून 25 लाख रुपये आरोपीने वेळोवेळी घेतले. परंतु त्याबदल्यात कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. गुंतवणूक केलेले पैसे आरोपीकडे मागितल्यावर त्याने सदर पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुढील तपास कोंढवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस उसगावकर करत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments