Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज प्लॉट देण्याच्या बहाण्याने १७ लाखांची फसवणूक; व्हिजन ग्रुपच्या सीएमडी सह दोघांवर गुन्हा...

प्लॉट देण्याच्या बहाण्याने १७ लाखांची फसवणूक; व्हिजन ग्रुपच्या सीएमडी सह दोघांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : प्लॉट देण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन १६ लाख ८७ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी व्हिजन ग्रुपचे सीएमडी व व्यंकटेश्वरा डेव्हलपर्सचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१९ दरम्यान नन्हे येथील नवले आयटी पार्कच्या ऑफिसमध्ये घडला आहे.

याप्रकरणी भारती राजीव शिखरे (४६, रा. वसंत विहार को ऑफ सोसायटी, वैशालीनगर, घाटीपाडा रोड, मुलुंड, मुंबई) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून व्हिजन ग्रुपचे सीएमडी योगेश दत्तात्रय भंडारे आणि व्यंकटेश्वरा डेव्हलपर्सचे दौलतराव उमाजी महाडिक (रा. वाई, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिजन ग्रुप चे सीएमडी योगेश भंडारे व व्यंकटेश्वरा डेव्हलपर्स चे दौलतराव महाडिक यांनी संगनमत करुन सेव्हन हिल्स प्रकल्प विक्रीसाठी दाखवला. फिर्यादी शिखरे यांना प्लॉट क्रमांक ६३आणि ६४ चे अलॉटमेंट लेटर दिले. यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी चेक तसेच एनएफडी द्वारे १६ लाख ८७ हजार ५०० रुपये घेतले. तसेच पैसे घेतल्याप्रकरणी बनावट पावत्या आरोपींनी शिखरे यांना दिल्या. यानंतर शिखरे यांनी भंडारे आणि महाडिक यांच्याकडे अनेकदा खरेदीखत करुन देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी खरेदीखत करुन देण्यास टाळाटाळ करुन शिखरे यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लाड करत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments