Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजप्रेयसीसाठी उच्च शिक्षित तरुण झाला दुचाकीचोरः पुणे अन् संभाजीनगरातून चोरी, बीडमध्ये विक्री

प्रेयसीसाठी उच्च शिक्षित तरुण झाला दुचाकीचोरः पुणे अन् संभाजीनगरातून चोरी, बीडमध्ये विक्री

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दारूचे व्यसन आणि प्रेयसीवर खर्चकरण्यासाठी पैशांची गरज यातूनउच्चशिक्षित तरुण अट्टल दुचाकीचोरबनला. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यालादुसऱ्यांदा ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या ७ दुचाकीजप्त करण्यात आल्या आहेत. पुणे, पुणे परिसर आणि छत्रपतीसंभाजीनगरमधून दुचाकी चोरीकरून तो बीड शहरातील ओळखीच्या लोकांना कमी पैशांमध्येविक्री करत होता.

सूरज शंकर गायकवाड (मूळ रा. सोन्नाखोटा, हमु पिंपरी चिंचवड, पुणे) हा तरुण दारूच्या व्यसनासाठी आणि प्रेयसीवर खर्चासाठी पैशांचीगरज असल्याने दुचाकीचोरीकडेवळला. बीडच्या अादित्यमहाविद्यालयातून त्याने औषधनिर्माणशास्त्रातील पदवीमिळवलेली आहे. त्याची प्रेयसीहीउच्चशिक्षित आहे.

तो बनावट चावीवापरून दुचाकीचोरी करायचा. यापूर्वीही गुन्हे शाखेने त्याला ताब्यातघेतले होते. मात्र जामिनावर सुटताचत्याने पुन्हा दुचाकीचोरी सुरू केली. पुणे, पुणे परिसर, छत्रपतीसंभाजीनगरमधून तो दुचाकीचोरीकरायचा आणि बीडमध्ये येऊन ओळखीच्या लोकांना कमी पैशांमध्येविक्री करायचा. सौदा करून अर्धपैसे घ्यायचा आणि कागदपत्रेदिल्यानंतर उर्वरित पैसे द्या असेसांगायचा.

मात्र, दुचाकीची कागदपत्रेतो देत नव्हता. दुचाकी विक्रीसाठी तोबीडमध्ये येणार असल्याची माहितीमिळताच गुन्हे शाखेच्या पथकानेत्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पीआय संतोष साबळे यांच्यामार्गदर्शनाखाली पीएसआय संजयतुपे, मोहन क्षीरसागर, कैलास ठोंबरे, नसीर शेख, अशोक दुबाले, युनूसबागवान, भागवत शेलार, बप्पाघोडके, विकी सुरवसे, चालक गणेशमराडे यांनी ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments