Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजप्रेयसीला भेटण्यास आलेल्या तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू; पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा...

प्रेयसीला भेटण्यास आलेल्या तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू; पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे – बारामतीहून प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह पाचजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

संग्राम हनुमंत साळुंके (वय २२, रा. वडकेनगर, बारामती, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन रेणुसे, आदित्य गवळी आणि अनिकेत चव्हाण यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्रामची आंबेगाव पठार परिसरातील एका महिलेशी ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. संग्राम प्रेयसीला भेटण्यासाठी बिबवेवाडी भागात येणार असल्याची माहिती रेणुसेला मिळाली होती.

संग्राम दोन डिसेंबरला सातारा रस्त्यावरील बिबवेवाडी परिसरात एका सर्व्हिसिंग सेंटरजवळ आला होता. आरोपींनी संग्रामला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अप्पर इंदिरानगर परिसरातील गॅस गोदामाजवळ नेले. त्याठिकाणी त्याला बेदम मारहाण केली. त्यात संग्राम गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संग्रामला रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

दरम्यान, संग्रामवर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यातच आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे संग्रामचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments