इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
वाघोली, (पुणे) : प्रेमसंबंधातून तरुणाने प्रेयसीला पळवून नेल्याच्यारागातून प्रेयसीच्या नातेवाईकांनी संबंधित तरुणाच्या वडिलांचेच अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाघोली (ता. हवेली) परिसरात सोमवारी (ता. 03) हि घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली असून अपहरण झालेल्या मुलाच्या वडिलांची सुखरूप सुटका केली आहे.
अभिजित दत्तात्रय भोसले (वय 22, रा. वाघमारे वस्ती, वाघोली), रणजित रमेश डिकोळे (वय 21, रा. लाडोबा वस्ती, वाडेबोल्हाई रोड, केसनंद), मारुती अशोक गायकवाड (वय 23, रा. वाडेगाव, बोलाई माता मंदिर, केसनंद) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
पालिसाना दिलल्या माहितीनुसार, फियादा माहला हिच्या मुलाच वाघोली येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. सोमवारी मुलगी मिळून येत नसल्याने तिचे नातेवाईक फिर्यादीच्या घरी दुपारच्या सुमारास आले. त्यांच्यात वादविवाद झाले. त्यानंतर ते निघून गेले होते.
काही वेळाने फिर्यादीचे घरी मुलीचा भाऊ व तिघे जण आले. त्यांनी फिर्यादी यांचे पतीला जबरदस्तीने घराबाहेर ओढून दुचाकीवरुन त्यांचे अपहरण केले. फिर्यादी महिला यांनी याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर माहितीच्या अनुषंगाने हडपसर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे व त्यांचे सहकारी वाघोली परिसरात रवाना झाले. आरोपी हे वाघोली, केसनंद, वाडे बोल्हाई परिसरात फिरत असल्याची माहिती बातमीदारांकडून मिळाली. होती. आरोपी हे बार्शी, सोलापूर या ठिकाणी जात असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे व तपास पथकाने आरोपींचा पाठलाग करुन त्यांना पाटस टोलनाका येथून ताब्यात घेतले.
दरम्यान, त्यांच्या ताब्यातून अपहरण केलेल्या मुलाच्या वडिलांची पोलिसांनी सुटका करीत तीन आरोपींना ताब्यात घेतले. तर यातील एक आरोपी पळून गेला. या घटनेत गुन्हा करताना वापरलेली दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगर करीत आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, परिवेक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र सलगर, पोलीस अंमलदार संदीप राठोड, अजित मदने, कुंडलीक केसकर, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अमोल जाधव गांनी केली आटे