Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजप्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खूनः प्रियकराने साथीदारासह तरुणाच्या डोक्यात हातोड्याने...

प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खूनः प्रियकराने साथीदारासह तरुणाच्या डोक्यात हातोड्याने केला वार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नर्स असलेल्या एका महिलेचे भारतीय लष्करात जवान म्हणून काम करत असलेल्य एका तरुणासोबत कोरोना काळात प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा व पतीची एक कोटीची विमा रक्कम मिळावी, याकरिता पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करण्याचा कट रचला. त्यानुसार जवान प्रियकराने साथीदाराच्या मदतीने प्रियेसीच्या पतीला गाठून त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्याच्या पाठीवर उभे राहून डोक्यात लोखंडी हातोडा मारुन त्याचा निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाच्या तपासात उघडकीस आला आहे.

राहुल सुदाम गाडेकर (वय-36, रा. नन्हे, आंबेगाव, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर, सैन्यात जवान पदावर काम करत असलेला आरोपी सुरेश मोटाभाऊ पाटोळे (रा. देहुगाव, पुणे) व त्याचा साथीदार रोहिदास नामदेव सोनवणे (32) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेबुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास राहुल गाडेकर हा चाकण येथील फोक्स वॅगन कंपनीत रात्रपाळी करिता चिंबळी, बर्गेवस्ती ते कुरुळी गावचे रस्त्याने दुचाकीवर जात होता. त्यावेळी त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन लोखंडी हातोडयाने डोक्यावर पाठीमागील बाजूस मारुन गंभीर जखमी करुन खून केल्याचा गुन्हा आळंदी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. याबाबतचा तपास आळंदी पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके करत होती. गुंडा विरोधी पथकाने गुन्ह्याचा तपास करताना, घटनास्थळावरील मार्गाचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच मयत तरुणाचे पत्नीचे मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करुन तिला चौकशीसाठी ताब्यात घेत तिच्याकडे सखोल चौकशी केली.

त्यावेळी या गुन्हयात मयताची पत्नी सुप्रिया गाडेकर ही पुण्यातील नन्हे परिसरातील नवले रुग्णालयात नर्स म्हणून कामास होती. परंतु कोरोना काळात तीने निमगाव पागा, ता. संगमनेर, अहमदनगर येथे लॅब चालु केली होती.

त्याठिकाणी व्यवसाय करताना, तिची ओळख दिल्ली येथे सैन्य दलात काम करणाऱ्या सुरेश पाटोळे याच्यासोबत झाली. त्यांचे ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. या कारणावरुन सुप्रिया व तिचा पती राहुल यांच्यात सतत भांडणे होत होती. सुरेश पाटोळे व सुप्रिया यांना राहुल हा त्यांचे प्रेमात अडथळा होत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे राहुलचा कायमस्वरुपी काटा काढण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार सुप्रिया हिच्या मदतीने सुरेश पाटोळे यांनी साथीदाराच्या सोबत राहुल याचा निघृण खून केल्याचे उघडकीस आले आहे.

तरुणाचे एकाच वेळी दोन तरुणींशी प्रेमप्रकरण उघडकीस पुण्यात कर्वेनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने एकाच वेळी त्याच्या ओळखीची तरुणी आणि त्याच्या मैत्रिणीशी प्रेमप्रकरण सुरू ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे याबाबत तरुणाला जाब विचारणाऱ्या तरुणीला रागाच्या भरात तरुणाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आकाश अनिल शिंदे (वय २५, रा. वारजे, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणी कर्वेनगर भागात राहण्यास आहे. तिचे आरोपी आकाश शिंदेशी प्रेमप्रकरण होते. आकाश शिंदे याने तरुणीच्या मैत्रिणीशी ओळख करून तिच्याशी काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध निर्माण केले. तरुणीला याबाबतची माहिती समजली. त्यावेळी याबाबत तिने आकाश याला जाब विचारला. त्याचा राग आल्याने आकाशाने तरुणीला जोरात ठोसा मारला. त्याच्या हातातील अंगठी भुवईजवळ लागल्याने तरुणी जखमी झाली आहे. त्यानंतर तरुणीने याबाबतची माहिती तिच्या मैत्रिणीला दिली. मैत्रिण आणि तरुणीने आकाशशी असलेले प्रेमसंबंध तोडल्याने तो रागावला. आकाशने सदर तरुणीला शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस गायकवाड पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments