Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान गमावले प्राण

प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान गमावले प्राण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

केरळ : 18 ऑक्टोबर 2023 | मल्याळम चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवलेले अभिनेते कुंद्रा जॉनी यांचं मंगळवारी निधन झालं. केरळमधल्या कोल्लम इथल्या एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 71 वर्षांचे होते. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गॉडफादर’ या चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली होती. त्यांच्या पार्थिवावर कधी आणि कुठे अंत्यसंस्कार करण्यात येतील, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. ‘फिल्म इम्प्लॉइज फेडरेशन ऑफ केरळ’ने (FRFKA) फेसबुकवर पोस्ट लिहित कुंद्रा जॉनी यांच्या निधनाची माहिती दिली. मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांनी प्राण गमावलं.

500 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका

केरळचे अर्थमंत्री केएन बालगोपाल यांनी श्रद्धांजली वाहताना लिहिलं, “कुंद्रा जॉनी यांनी त्यांच्या चार दशकाच्या करिअरमध्ये 500 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे.’ मल्याळम • फिल्म इंडस्ट्रीतील इतर सेलिब्रिटींकडूनही सोशल मीडियाद्वारे कुंद्रा यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

‘किरीदम’मधील भूमिका गाजली

कुंद्रा जॉनी यांनी 1979 मध्ये ‘नित्या वसंतम’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी खलनायकी भूमिका साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती किरीदम आणि ‘चेनकोल या चित्रपटांमधील त्यांच्या कामाचं विशेष कौतुक झालं होतं. याशिवाय त्यांनी ‘वाजकई चक्रम’ आणि ‘नदीगन’ यांसारख्या तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं होतं.

मोहनलाल यांच्या ‘किरीदम’ या चित्रपटात कुंद्रा जॉनी यांनी परमेश्वरनची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचं प्रेक्षक- समिक्षकांकडून खूप कौतुक झालं होतं. त्यांच्या इतर काही दमदार चित्रपटांमध्ये ’15 ऑगस्ट’, ‘हॅलो’, ‘अवन चंडीयुडे माकन’, ‘भार्गवचरितम मुन्नम खंडम’, ‘बलराम बनाम थरादास’, ‘भारत चंद्रन आईपीएस’, ‘दादा साहेब’, ‘क्राइम फाइल’ यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments