इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कोल्हापूर : कोठडीत असणारा कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याचीकोठडीची मुदत रविवारी संपली. त्यामुळे जुना राजवाडा पोलिसांनी त्याला व्हीसीद्वारे न्यायालयात हजर केले. यावेळी बारावे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ए. ए. व्यास यांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. बचाव पक्षाने तातडीने जामीन अर्ज सादर केला. मात्र, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मंगळवार, १ एप्रिल रोजी जामिनावर निर्णय होणार आहे.
कोरटकरचे वकील अॅड. सौरभ घाग यांनी व्हीसीद्वारे युक्तिवाद करत, कोरटकरला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे, त्यामुळे न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी विनंती केली. त्यानंतर थोड्याच वेळात जामीन अर्ज सादर केला. मात्र पोलीस, सरकारी वकील आणि मूळ फिर्यादी यांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय जामीन अर्जावर असा तातडीने निर्णय घेता येणार नाही, असे न्यायाधीशांनी सांगितले.
प्रवेशद्वारावर चोख बंदोबस्त
रविववारी सुट्टी असल्याने न्यायसंकुलात प्रवेश करणारे दोन्ही गेट बंद होते. प्रवेश गेटवर राज्य राखीव दलाच्या जवानांसह मोठा बंदोबस्त नेमला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती.
दोन कार जप्त
कोरटकरने दोन कार वापरल्या होत्या. त्यातील त्याची एक कार, तर दुसरी कार धीरज चौधरी याची होती. या दोन्ही कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या वाहनांवर हल्ला होण्याची शक्यता ओळखून त्या सुरक्षित ठिकाणी पोलिसांनी ठेवल्या आहेत.