इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आता पोलीस कोठडीतुन जेलमध्ये हलवण्यात आल आहे. त्याने जामिनीसाठी अर्ज केला होता मात्र यावर एक एप्रिलला सुनावणी ठेवल्याने त्याचा मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने त्याला आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पाच दिवस पोलीस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
छत्रपती शिवरायांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा कोरटकर कोर्टासमोर हात जोडून उभा होता. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला. त्याने तात्काळ वकिलांच्या माध्यमांतून जामीनसाठी अर्ज केला. मात्र हा अर्ज कोर्टाने स्वीकारत त्यावर एक एप्रिलला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे आता त्याचा मुक्काम कळंबा जेलमध्ये असणार आहे. कोरटकरला शिवरायांचा अवमान करणे आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणे चांगलेच भोवल्याचे दिसत आहे.
कोरटकरने वापरलेली मर्सिडीज कार पोलिसांनी जप्त केली असूनत्याच्या वकिलानी केलेल्या मागणीनुसार त्याला कळंबा जेलमध्ये सुरक्षित ठेवण्याच्या सूचना पोलिसांना कोर्टाने दिल्या आहेत.