इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. येत्या एक एप्रिल पासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल महागणार असून प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
याबबत माहिती अशी की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरूनचां प्रवास एक एप्रिल पासून आता अधिक खर्चिक होणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील टोल तीन टक्क्यांनी महाग होणार आहे. तर चारचाकी वाहनाकरता एकेरी प्रवासाच्या टोलमध्ये पाच रूपयांची वाढ होणार आहे. दरम्यान दुसरीकडे फास्ट टॅग सक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व टोलनाक्यांवर एक एप्रिलपासून प्रत्येक वाहन धारकांना फास्टटॅग अनिवार्य असणार आहे. वाहनधारकांच्या वाहनाला फास्टटॅग नसेल तर टोलचे दुप्पट पैसे भरावे लागणार आहे.
१ एप्रिल २०२५ नंतर फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्यापूर्वी फास्टटॅग खरेदी करून त्याचा वापर करावा लागणार आहे अन्यथा टोलची दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे.