Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज प्रवाशांचे दागिने हिसकाविणारा आरोपी जेरबंद: स्वारगेट एसटी स्थानकात घडला होता कारनामा;...

प्रवाशांचे दागिने हिसकाविणारा आरोपी जेरबंद: स्वारगेट एसटी स्थानकात घडला होता कारनामा; आरोपी मुळ संभाजीनगरातील

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांचे दागिने हिसकाविणाऱ्यासह मोबाइल चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज आणि १६ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी एसटी स्थानकात धुडगूस घातला होता.

त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संतोष रामकृष्ण शंकपाळ (वय ४९ रा. सर्मीक विहार, जैननगरी, पिसादेवी छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुरेश बाळासो शिंदे (वय ५७ रा. कुंदळवाडी फाटा चिखली) यांनी फिर्याद दिली होती.

स्वारगेट एसटी स्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन चोरटयाने शिंदेच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरी केली होती. पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू केला. पेट्रोलिंगवेळी एक संशयीत पोलिसांना दिसून आला. त्याला ताब्यात घेण्यासाठी पथक जाताच तो पळून जाउ लागला. काही अंतरावर आरोपी संतोषला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अर्धवट तुटलेली सोन्याची चैन मिळुन आली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, एपीआय प्रशांत संदे, उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, विजय कुंभार, सोमनाथ कांबळे, सुजय पवार, शिवा गायकवाड, अनिस शेख, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, अनिस शेख यांनी केली.

१६ मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

पीएमपीएल बसमध्ये शिरत असताना तरूणाच्या खिशातील मोबाइल चोरणाऱ्या दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख रूपये किंमतीचे १६ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. दत्तात्रय रामदास गाडे (वय ३४ रा. गुनाट ता. शिरुर, पुणे) आणि किरण शेवाराम चव्हाण (वय ३४ रा स्वारगेट) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments