Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज प्रवाशांचे दागिने चोरणारी महिला जेरबंद: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात करत होती...

प्रवाशांचे दागिने चोरणारी महिला जेरबंद: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात करत होती हात साफ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मागील काही दिवसांपासून पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांचे दागिने चोरी होण्याच्या घटना वाढत होत्या. याअनुषंगाने स्वारगेट पोलिसांचे पथकाने एसटी स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत, संशयित आरोपी महिलेची ओळख पटवली. त्याआधारे आरोपी महिलेचा शोध घेऊन तिला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी दिली आहे.

कार्तिका शरमा चव्हाण (वय 30, रा. खानापूर, ता. शेवगाव, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून पोलिसांनी 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचे 33 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तपासात जप्त करण्यात आलेत. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात भगवान शेटीबा आतार (वय-56, रा. मुंबई) यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार भगवान आतार हे स्वारगेट एसटी स्थानकात 21 जानेवारी रोजी बसमध्ये चढत असताना मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चारेट्याने त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरी करुन नेली होती.

या गुन्हयाचा तपास सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे यांचे पथक करत असताना पथकातील पोलिस अंमलदार सुरजय पवार, संदीप घुले, शिवा गायकवाड यांनी स्वारगेट एसटी स्थानकात जाऊन स्वारगेट बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या माहितीवरुन तपास केला असता स्वारगेट एसटी स्थानकात वारंवार पेट्रोलिंग करत असताना, एक महिला संशयास्पदरित्या फिरत असल्याची दिसून आली. त्यामुळे पोलिस कर्मचारी सुनीता खामगळ यांनी तिला आवाज देत तिच्या दिशेने जाताच ती पळून जाऊ लागली. त्यामुळे पोलिसांनी तिचा पाठलाग करुन तिला पकडले. त्यानंतर केलेल्या चौकशीत तिने तिचे नाव कार्तिका चव्हाण असल्याचे सांगितले. तिच्या तपासात पोलिसांनी 2 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मागील 15 दिवसांत स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले सोने चोरीचे एकूण 4 गुन्हे व मोबाईल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. या गुन्ह्यात 3 महिला आरोपी व 3 पुरुष आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून तपासात 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 2 लाख 5 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण 16 स्मार्ट फोन असा 5 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस उपायुक्त र्मतना पाटील, एसीपी नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि सुरेशसिंग गौंड यांच्या पथकातील एपीआय प्रशांत संदे, पीएसआय प्रतापसिंह शेळके, अंमलदार सुजय पवार, संदीप घुले, शिवा गायकवाड, अनिस शेख, फिरोज शेख, रमेश चव्हाण, विजय कुंभार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments