इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी राज्यातील शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने गुरुवार (दिनांक ६ मार्च) रोजी सकाळच्या सत्रात दोन तास धरणे आंदोलन -सत्याग्रह करण्यात येणार आहे.
सर्व शिक्षक शिक्षकेत्तर मुख्याध्यापकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी केले आहे. माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत.
माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी बक्षी समितीने शिफारस केल्याप्रमाणे नवीन सुधारित ‘आश्वासित प्रगती योजनेचा ‘१०:२०:३० वर्षाचा लाभ तत्काळ मिळावा, पात्र शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विनाअट पदोन्नती द्यावी, माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला २४ वर्षाचा दुसरा लाभ हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या तारखेस लागू करण्यात आला तेंव्हापासून तो लागू करण्यात यावा यांसह शासन दरबारी असणाऱ्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन खांडेकर यांनी केले आहे ..