Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजप्रधानमंत्री आवास योजनेतील समस्यांसंदर्भात आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

प्रधानमंत्री आवास योजनेतील समस्यांसंदर्भात आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील समस्यांसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार राहुल कुल यांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे.

यावेळी आमदार राहुल कुल यांनी निवेदनात विविध मागण्या केल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील (BLC) प्रलंबित 12,500 लाभार्थ्यांच्या प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात यावी, पात्र लाभार्थ्यांच्या अनुदानाची देय रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी, प्रकल्प अहवालामध्ये (DPR) समाविष्ट आहे. मात्र, अद्यापही घराचे बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. वगळलेल्या लाभार्थ्यांच्या जागी नवीन लाभार्थ्यांच्या समावेश करण्यात यावा, अशा विविध मागण्या आमदार कुल यांनी केल्या आहेत.

तसेच या योजनेच्या अंमलबजावणीतील विलंब, प्रशासकीय अडथळे दूर करून नवीन प्रधानमंत्री आवास योजना 2.0 साठी नवीन तपशीलवर प्रकल्प अहवाल (DPR) मंजुर करण्यात यावे, अशी मागणी कुल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदेनी प्रशासनास दिले आहेत.

प्रलंबित प्रकल्प अहवालास मंजुरी मिळून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समाविष्ट गावातील लाभार्थ्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. 2019 पासून सातत्याने या योजनेचा पाठपुरावा करत असून या योजनेद्वारे दौंड तालुक्यातील सुमारे 700 घरकुलांचे काम पूर्णत्वास येत आहे. तिसऱ्या DPR मधील 1400 हून अधिक घरकुलांना लवकरच मंजुरी मिळणार आहे. दौंड तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार कुल यांनी निवेदनात सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments