Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजपोहणं बेतलं जीवावर...! शेततळ्यात बुडून ४ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत; आंबेगाव तालुक्यातील घटना

पोहणं बेतलं जीवावर…! शेततळ्यात बुडून ४ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत; आंबेगाव तालुक्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मंचर, (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना निरगुडसर येथे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. श्रद्धा काळू नवले (वय-13), सायली काळू नवले (वय-11), दीपक दत्ता मधे (वय-7) राधिका नितीन केदारी (वय-14) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचे संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथील कामगार गोरक्षनाथ बबन कवठे हे पत्नी ज्योती, दत्तक मुली श्रद्धा काळू नवले व सायली काळू नवले यांच्यासमवेत निरगुडसर येथे राहून मजुरीचे काम करत होते. तर मूळचे कानेवाडी (ता. खेड) येथील तीन कुटुंब कामासाठी निरगुडसर येथे आले. हे सर्वजण पोंदेवाडी येथे शेतात काम करण्यासाठी गेले होते.

मुले दीपक मधे आणि राधिका केदारी हे घरीच होते. दुपारी श्रद्धा नवले, सायली नवले, दीपक मधे, राधिका केदारी हे चौघे पोहण्यासाठी जवळ असलेल्या शेततळ्यात गेले. शेततळ्यात पाच ते सात फूट पाणी होते. पोहत असतानाच चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात पाणी भरत असताना तेरा वर्षाचा सुरज गोरक्षनाथ कवठे हा मुलगा धावत येऊन त्याने चार जण पाण्यात बुडाल्याची माहिती दिली.

त्यानंतर सुरज कवठे व त्यांची पत्नी ज्योती यांनी तातडीने शेततळ्याकडे धाव घेतली. या शेततळ्याला तारेचे कंपाउंड असून या तारेतून चौघे आत गेले होते. या चौघांना पाण्याबाहेर काढून तातडीने उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments