इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दौंड: शहरातून मारहाणीची बातमी समोर आली आहे. पोलीस स्टेशनच्या समोरच हॉर्न वाजवला नाही.. असे कारण पुढे करत दोन गटात मारहाण झाल्याची घटना घडली. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी कायदे विषयक मार्गदर्शनासाठी तेथील पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, पत्रकार यांच्यासाठी पोलीस स्टेशन येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्वजन हजर असताना समोरसमोरच मारहाणीची घटना घडली आहे. पोलिस, मीडिया, पत्रकार आणि पोलीस पाटलासमोरच ही घटना घडली. यामुळे पोलीसांनी स्वतः तक्रारदारच्या भूमिकेतून मारहाण करणाऱ्या दोन्ही गटातील युवकांवर भारतीय न्याय संहिता कलम 192(2),115(2),351(2), 352, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110,112,117 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी विश्वजीत दीपक चितारे, अक्षय भरत चितारे, सोमेश सुधाकर चितारे, प्रज्वल राम बनसोडे, राम हनुमंत बनसोडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सर्वच जन हे दौंड येथील जगदाळे वस्ती येथील रहिवाशी आहेत. ही बुधवार १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास दौंड पोलीस स्टेशनच्या समोर घडली आहे.
पोलिसांनी भांडणाचे कारण विचारले असता जगदाळे वस्ती येथे मोटरसायकल चालकाने हॉर्न दिला नाही या कारणावरून वाद झाल्याचे समोर आले. वाद झाल्यानंतर दोन्ही गट तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले होते. तेंव्हा तिथेच त्यांच्यात परत वाद सुरू झाला. नंतर दोन्ही गटात मारहाण झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या पोलिसांनीच तक्रारदार होत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार घाडगे करीत आहेत.