Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पोलीस आयुक्तांचे 'मोक्का'स्त्र! पुण्यातील निखिल कुसाळकर टोळीवर मोक्का

पोलीस आयुक्तांचे ‘मोक्का’स्त्र! पुण्यातील निखिल कुसाळकर टोळीवर मोक्का

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : अठरा वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करत चेहरा विद्रूप केल्याप्रकरणी निखिल विजय कुसाळकर त्याच्या साथीदारांविरोधात चतुः श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली असून निखिल कुसाळकर आणि त्याच्या पाच साथीदारांविरोधात मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत पुणे शहरातील ९६ टोळ्यांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्यानुसार कारवाई केली आहे.

टोळीप्रमुख निखिल विजय कुसाळकर (वय २२), अभिजीत उर्फ प्रफुल्ल बबन चव्हाण (वय २१), सुबोध अजित सरोदे (वय २०), ओमकार सोमनाथ हिंगाडे (वय २२), अयाज रईस उर्फ रईसद्दीन इनामदार (वय १९) कल्पेश उर्फ पाकुळी रमेश कराळे अशी मोका कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ओमकार हिंगाडे याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

आरोपी निखिल कुसाळकर याने स्वतःची संघटित टोळी तयार केली आहे. त्याच्या या टोळीकडून अवैध मार्गाने आणि इतर फायदे मिळवण्यासाठी दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण, गंभीर दुखापत, नागरिकांच्या मालमत्तेची तोडफोड करून नुकसान करणे, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार केले आहेत. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याने पुन्हा पुन्हा गंभीर गुन्हे केले आहेत. दरम्यान निखिल कुसाळकर टोळीची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सादर केला होता. या प्रस्तावाची छाननी करून कुसाळकर आणि त्याच्या पाच साथीदार विरोधात मोक्का नुसार कारवाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments