Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपोलीसांचाच भ्रष्टाचार ! 35 हजारांची लाच घेताना दोन अधिकाऱ्यांना अटक; 'एसीबी'ची वडगाव...

पोलीसांचाच भ्रष्टाचार ! 35 हजारांची लाच घेताना दोन अधिकाऱ्यांना अटक; ‘एसीबी’ची वडगाव मावळ पोलीस ठाण्यात कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : एका दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी एका व्यक्तीकडून 35 हजारांची लाच घेणा-या वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील सहायक फौजदारासह पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे.

सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील तुळशीदास मगर (वय-55), पोलीस अंमलदार सागर कैलास गाडेकर (वय-34) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यांच्याविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका मारामारीच्या प्रकरणाचा तपास या दोन्ही आरोपींकडे होता. तपासात मदत करण्याच्या नावाखाली त्यांनी तक्रारदाराकडे 50 हजारांची लाच मागितली होती. त्यात तडजोडीअंती 35 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले. त्यानंतर वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीत सापळा रचण्यात आला. सुनिल मगर व सागर गाडेकर यांनी तक्रारदाराकडून 35 हजार रुपये स्वीकारताना दोघांना पकडण्यात आले.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments