Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपोलिस शिपायाची गचांडी पकडत मारहाणः जेलरोड मार्शल ड्युटीवर असलेल्या पोलिसावर हल्ला;...

पोलिस शिपायाची गचांडी पकडत मारहाणः जेलरोड मार्शल ड्युटीवर असलेल्या पोलिसावर हल्ला; सरकारी कामात अडथळा, गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मित्रांच्या सुरू असलेल्या भांडणात त्याला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी घेऊन जात असताना जेलरोड मार्शल ड्युटीवर असलेल्या पोलिस शिपायाची गचांडी पकडत मारणाऱ्या एकावर येरवडा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 13 एप्रिल रोजी रात्री पावणे आठ ते सव्वा आठच्या सुमारास घडला.

अक्षय रविंद्र बडगुजर (28, रा. रा. गायरानवस्ती, केशवनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई विजय बाळासाहेब माने यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दि. 13 एप्रिल रोजी फिर्यादी विजय माने हे जेलरोड येथे मार्शल ड्युटीवर होते. त्यावेळी त्यांना त्यांचे सहकारी डुकरे यांनी उमेश तटकरे ह्या माने यांच्या मित्राबरोबर अक्षय बडगुजर हा वाद घालत असल्याचे सांगितले. त्यानंतर विजय माने भांडणाच्या ठिकाणी गेले व तेथून ते उमेश तटकरे यांना बडगुजर याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी दुचाकीवर घेऊन जात होते. त्याचवेळी बडगुजर हा मागुन पळत त्यांच्याकडे गेला. त्याने गाडीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत हाताने माने यांच्या डोक्यात मारून त्यांची गचांडी पकडली. यात त्यांच्या शर्टाच्या गुंड्या तुटल्या. ते पुन्हा दुचाकीवरून जात असताना त्यांना बडगुजर याने डॉन बॉस्को स्कुलजवळ माने यांच्या डोक्यात बुक्की मारली. यावेळी गाडीवरचा तोल जाऊन दोघेही खाली पडले. यावेळी बडगुजर याने तटकरे यांना व माने यांना मारण्यास सुरवात केली. या सर्व प्रकारानंतर येरवडा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळला आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार गोल्फ क्लब व डॉन बॉस्को स्कुल जवळ घडला. पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments