Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपोलिस शिपायाचा महिलेवर बलात्कारः हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पोलिस शिपायाचा महिलेवर बलात्कारः हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहित तरूणीवर बलात्कार करणाऱ्या पोलिस शिपायाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. उच्च न्यायालायाने या पोलिसाचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यासाठी उच्च न्यायालयात पुरावे सादर केले होते.

दीपक सीताराम मोधे असे अटक करण्यात आलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. आरोपी मोधे खडक पोलिस ठाण्यात नियुक्तीस होता. करोना संसर्ग काळात त्याने एका महिलेला घरी जेवण करण्यासाठी बोलाविले होते. तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. सदर पोलिसाने मोबाइलवर तिची चित्रफीत देखील तयार केली. त्यानंतर चित्रफीत प्रसारित करण्याची, तसेच महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती.

महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून मोधेने तिच्याकडून 6 तोळ्यांचे दागिने, लॅपटॉप, मोबाइल घेतला. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरारी झाला. त्याने सत्र आणि उच्च न्यायालायात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळून लावला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पोलीस कर्मचारी दीपक मोधेला शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक संपतराव राऊत, सहायक निरीक्षक वैशाली तोटेवार, उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे यांनी ही कारवाई केली. याबाबत पुढील तपास खडक पोलिस करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments