Sunday, May 19, 2024
Homeक्राईम न्यूजपोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कारः तर धमकावून गर्भपात; पोलिस उपनिरीक्षकावर पुण्यात...

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कारः तर धमकावून गर्भपात; पोलिस उपनिरीक्षकावर पुण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार, तसेच धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षकाने पीडित तरुणीला धमकावून जामखेड परिसरातील एका रुग्णालयात गर्भापात केल्याचे तरुणीने दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे.

किरण माणिक महामुनी (वय ३८, रा. नागपूर) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणी पोलीस भरतीची तयारी करत असून तिची महामुनीशी ओळख झाली होती. त्याने तिला मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.

महामुनीने तिच्यावर त्यानंतर शिवाजीनगर भागातील घरी वेळोवेळी बलात्कार केला. यामुळे तरुणी गर्भवती झाल्याने त्याने तिला अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे तिला बळजबरीने धमकावून गर्भपात केला, असे तरुणीने तक्रारीत सांगितले आहे. तरुणीने याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक एस काळे पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments