Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपोलिस कर्मचाऱ्याच्ऱ्या पत्नीला 28 लाखाचा गंडाः म्हाडात सदनिका देण्याचे आमिष; भारती...

पोलिस कर्मचाऱ्याच्ऱ्या पत्नीला 28 लाखाचा गंडाः म्हाडात सदनिका देण्याचे आमिष; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीला म्हाडामध्ये सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २८ लाखाचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ३४ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार सुनिल नामदेव गडकर (रा.आंबेगाव) आणि दोन महिलांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सुनिलवर अगोदर विश्रामबाग पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार महिलेची आरोपी सुनिलबरोबर एका चौकीत ओळख झाली होती. यावेळी त्यांने मंत्रालयात क्लार्क असल्याचे सांगितले. त्याने बोगस ओळखपत्र दाखवून विश्वास संपादन केला. यानंतर राजराम पुलाजवळील व्यंकटेश स्काय डेलमध्ये म्हाडाची सदनिका मिळवून देतो असे सांगितले. यानंतर दोन महिण्यात त्यांच्याकडून तब्बल २८ लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता करत आहेत.

वाडिया महाविद्यालयाच्या आवारात चंदन चोरी

पुणे शहरातील वाडिया महाविद्यालयाच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत वाडिया महाविद्यालयातील सुरक्षारक्षक बाबुराव श्रीपती गजेशिव (वय ६० रा. भोरी भडक, ता. दौंड, जि. पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाडिया महाविद्यालयाच्या आवारात मध्यरात्री चोरटे शिरले. महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या कला शाखेच्या इमारतीपासून काही अंतरावर असलेली चंदनाची दोन झाडे चोरट्यांनी कापून नेली. पोलीस हवालदार एस जढर तपास करत आहेत. पुणे शहरात मागील वर्षभरापासून चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments