Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपोलिस उपायुक्तांची कारवाई: महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्यासह दोन पोलिस शिपाई...

पोलिस उपायुक्तांची कारवाई: महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्यासह दोन पोलिस शिपाई निलंबित

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

हडपसर पोलिस स्टेशनच्या अंकित असणाऱ्या मगरपट्टा सिटी पोलिस चौकीत एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दामिनी पथकातील दोन महिला पोलिसांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद दोरकर, महिला पोलिस अंमलदार उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

हडपसर पोलिस ठाण्यात १ फेबुवारी रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्हयातील फिर्यादीने संशय व्यक्त केल्यामुळे त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला ९ फेब्रुवारी रोजी हडपसर पोलिसांनी मगरपट्टा पोलिस चौकीत चौकशीकामी बोलाविले होते.

महिला पोलिसांच्या समक्ष चौकशी केल्यानंतर संबंधित महिलेस पुन्हा सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा हजर राहण्याची समज देवुन त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आपल्याला गुन्हयामध्ये अटक होऊ शकते या भीतीमुळे संबंधित महिलेने नातेवाईकांसह मगरपट्टा पोलिस चौकीत येवुन गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पोलिसांनी आपल्याला मारहाण केली असा आरोपी देखील संबंधित महिलेने केला. दरम्यान, प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

त्याची दखल घेवून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनाप्रमाणे संबंधित महिलेच्या आरोपाच्या तक्रारीवरून चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद दोरकर, दामिनी पथकातील पोलिस अंमलदार उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले यांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय्य चौकशी सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments