Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पोलिस उपनिरीक्षककडून पाच लाखांची मागणीः पुणे पोलिस दलातील उपनिरीक्षकासह वकील एसीबीकडून...

पोलिस उपनिरीक्षककडून पाच लाखांची मागणीः पुणे पोलिस दलातील उपनिरीक्षकासह वकील एसीबीकडून अटकेत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात पाच लाख रुपयांची लाच मागून एकाकडून तडजोडीत 40 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिस उपनिरीक्षकासह वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून सोमवारी रात्री अटक केली. एरंडवणे भागातील अलंकार पोलिस ठाण्याच्या आवारात सदरची कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश वसंत चव्हाण (वय ३५, रा. शासकीय पोलिस वसाहत, परमारनगर, वानवडी, पुणे), अॅड. राहुल जयसिंग फुलसुंदर (वय ३१, रा. चित्रदुर्ग अपार्टमेंट, कोथरुड, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका तरुणाने तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या भावाविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटक न करणे, तसेच तपासात सह्याय करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांनी पाच लाख रुपयांची लाच तक्रारदार मागितली होती. तक्रारदार तरुणाने तडजोडीत पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये देण्याचे मान्य करून तक्रार दिली.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलंकार पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा लावून चव्हाण यांच्यासाठी लाच घेणारे वकील अॅड. फुलसुंदर यांना पकडले. चौकशीत चव्हाण यांच्यासाठी लाच घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव, पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलिस शिपाई तावरे, डावखर, कदम यांनी ही कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments