Tuesday, December 3, 2024
HomeUncategorizedपोलिसांनो त्यांना सोडा, ती माझी लोकं आहेत; अजित पवार भरसभेत पोलिसांवर भडकले

पोलिसांनो त्यांना सोडा, ती माझी लोकं आहेत; अजित पवार भरसभेत पोलिसांवर भडकले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भोर : गेल्या कित्येक वर्षांपासून भोरचा विकास झालेला नाही, तरी तुम्ही त्याच त्याच व्यक्तीला का निवडून देता? असा सवाल करत अजित पवारांनी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यावर जोरदार हल्लबोल केला. आज अजित पवारांनी भोर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले अजित ?

अजित पवार म्हणाले की, भोर तालुक्यात आल्यावर मला लाज वाटते. काय इथलं बसस्थानक ? एकदा माझ्या बारामतीमध्ये येऊन आमचं बसस्थानक बघा. विकास बघा. मी याआधीही राजगड सहकारी साखर कारखाना माझ्या लोकांच्या हाती द्या, असे सांगितले होते. पण तुम्ही ऐकलं नाही. आज इतर कारखाने पुढं गेले. मात्र, राजगडची अवस्था वाईट आहे. भोरवासियांना मी साष्टांग दंडवत घालतो. इतकी असुविधा असूनही तुम्ही एकाच माणसाला निवडून देता. तुमची कधी सटकणार? असा सवाल करत अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली.

पोलिसांनो त्यांना सोडा, ती माझी लोकं आहेत

भाषण करत असताना अजित पवारांची नजर बाजूला उभ्या असलेल्या लोकांवर गेली. स्टेजसमोर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या लोकांना बसायची परवानगी द्या, ये, पोलिसांनो त्या लोकांना सोडा. ती माझी लोकं उभी आहेत. त्यांना कोण अडवतंय, ते बघतो. सोडा त्यांना. मला झेड दर्जाची सुरक्षा आहे, मी सांगतोय त्यांना इथं बसवा. लोकं उभी राहत आहेत. हा कुठला न्याय. आमच्यामागं लोक असतील तर आम्हाला महत्त्व. नाहीतर कोण कुत्रही विचारणार नाही आम्हाला, असं म्हणत अजित पवारांनी पोलिसांना डाफरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments