Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपोलिसांच्या नजरेत न येण्यासाठी संदीप वापरायचा व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क: पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये...

पोलिसांच्या नजरेत न येण्यासाठी संदीप वापरायचा व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क: पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये तपासामध्ये नवीन माहिती समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पोलिस यंत्रणेच्या नजरेत न येण्यासाठी ड्रग्ज तस्करीचा मास्टरमाइड संदीप धुनिया हा व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापर करून इतर साथीदारांच्या संपर्कात राहत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याचबरोबर ओळख लपवण्यासाठी धुनिया आधार कार्डसारखी कागदपत्रे खोट्या नावाने तयार करून वावरत असल्याचे समोर आहे.

गुन्हे शाखेने पुण्यात विश्रांतवाडी, सांगलीत कुपवाडा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून तब्बल ३ हजार ६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी १० आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात पुणे पोलिस ७ आरोपींचा शोध घेत असून ब्रिटनचा पासपोर्ट असणारा संदीप धुनिया हा ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइड समजला जात आहे. याचबरोबर दोन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीससुद्धा काढण्यात आली आहे. महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने (डीआरआय) २०१६ मध्ये संदीप धुनियाला ड्रग्जप्रकरणी अटक केली होती. यानंतर जुलै २०२३ मध्ये संदीप धुनियाला या प्रकरणात जामीन मिळाला होता. संदीप धुनिया यानंतर मेफेड्रोनचा फॉर्म्युला देणाऱ्या केमिकल इंजिनिअरचा शोध घेत होता. या वेळी एका मध्यस्थामार्फत डोंबिवली येथील युवराज भुजबळचा संपर्क मिळाला. यानंतर ऑक्टोबर २०२३ पासून कुरकुंभ येथील अर्थ केम या कारखान्यात मेफेड्रोन बनवले जाऊ लागले.

व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क नेमके काय असते?

डेटा लीक न होता पुढच्याशी संपर्क केला जातो. तुमचा पत्ता आणि तुमची ओळख गोपनीय राहते. आयपी अ ड्रेस ट्रॅक करता येत नाही. व्हीपीएन हे एक मोबाइल अॅप्लिकेशन किंवा कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअरच्या स्वरूपामध्ये असते. ते चालण्यासाठी संबंधित कंपन्यांनी जगभरामध्ये हजारो सर्व्हर तयार केलेले असतात. याला डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला हवी असलेली लोकेशन निवडल्यानंतर आपण त्यांच्या सर्व्हरला जोडले जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments