Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पोलिसांच्या कानशिलात मारणाऱ्या भाजपचे आमदार सुनील कांबळेवर गुन्हा दाखल

पोलिसांच्या कानशिलात मारणाऱ्या भाजपचे आमदार सुनील कांबळेवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : स्टेजवरुन उतरताना अडखळणाऱ्या आमदाराला सावरले असताना आभार मानण्याऐवजी त्यांच्या कानशिलात आमदार सुनील कांबळे यांनी मारली होती. याबाबत शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केल्याबद्दल आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस अंमलदार शिवाजी सरक (वय ३५) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ससून रुग्णालयातील कार्यक्रमादरम्यान शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.ससून रुग्णालयातील ११ मजली इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवाजी सरक यांना बंदोबस्तासाठी थांबविण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आमदार सुनील कांबळे हे स्टेजवरुन खाली उतरत असताना त्यांचा पाय अडखळला. ते पाहून फिर्यादी हे पुढे होऊन त्यांनी सावरले असताना सुनील कांबळे यांनी डाव्या हाताने त्यांच्या कानशिलात मारली. फिर्यादी यांनी त्यांना पोलीस असल्याचे सांगितले असता त्यांनी फिर्यादी यांना मग काय झाले असे मोठ्याने दरडावून फिर्यादी यांना शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments