Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपोर्शे कार अपघातातील मृत मुलांच्या पालकांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; मृतांच्या...

पोर्शे कार अपघातातील मृत मुलांच्या पालकांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 10 लाखांची मदत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातानंतर राज्यात संतप्त पडसाद उमटले होते. देशभरात हे प्रकरण गाजले गेलं. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी सोमवारी (25 जून 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या मृत मुलांच्या पालकांचं सांत्वन केलं. तसेच, झालेली घटना दुर्दैवी असून दोषींना लवकरात लवकर कठोर शासन केलं जाईल, असं आश्वासनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

पोर्शे कार अपघात मृत झालेल्या घटनेतील अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली असताना देखील ही केस नव्यानं उघडून त्यात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं. तसेच, या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींवर लवकरात लवकर शासन व्हावं यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आई-बापाच्या हाताशी आलेली मुलं अचानक गेल्याने झालेल्या दुःखाची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या दोन्ही मृत मुलांच्या कुटूंबियांना पुन्हा सावरता यावे यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णयही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments