Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पैसे एकमेकांना देताना वाद; तरुणाचा गळा चिरून खून, कोंढव्यातील घटना

पैसे एकमेकांना देताना वाद; तरुणाचा गळा चिरून खून, कोंढव्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : क्रेडिट कार्डवरून पैसे काढून एकमेकांना देत असताना झालेल्या वादातून एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

शहानवाज ऊर्फ बबलू असे खून झालेल्याचे नाव आहे. नोमान जावेद खान (वय २४, रा. उंड्री) याला कोंढवा पोलिसांनी पकडले असून, साहिल युसूफ शेख (वय २५, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), साजुद्दीन सद्दाम शेख (वय ३५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांनी खून केल्यानंतर अंगावरील रक्ताचे डाग असणारे कपडे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळल्याचे समोर आले आहे. याबाबत समीर मुनीर सय्यद (रा. ताहिर हाईट्स, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

अधिक माहितीनुसार, शहानवाज हा जागा खरेदी-विक्रीचे तसेच मिळेल ते काम करत होता. तो नेहमीप्रमाणे घरातून कामानिमित्त सामेवारी बाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने घरच्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, सकाळी लुल्लानगर येथे जाण्यासाठी पारसी ग्राऊंडवरून काही महिला पायी निघाल्या होत्या. त्यांना त्याचा मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. तो शहानवाज याचा असल्याचे दिसून आले. त्याच्या पोटावर उजव्या आणि डाव्या बाजूला धारदार हत्याराने भोसकल्याचे व गळा चिरल्याचे दिसत होते. याबाबत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना एकमेकांसमोर बसवून खुनाचे कारण तपासण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप भोसले अधिक तपास करत आहेत!

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments