Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पैशांच्या व्यवहारातून पेंटरचा खूनः पोलिसांनी 6 आरोपींना केले गजाआड; पिंपरी चिंचवड शहरातील...

पैशांच्या व्यवहारातून पेंटरचा खूनः पोलिसांनी 6 आरोपींना केले गजाआड; पिंपरी चिंचवड शहरातील घटना, वाकड पोलिसांची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिसांना न्यू थेरगाव हॉस्पिटल मधून 26 जानेवारी रोजी फोन आला की, एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत दोन जण हॉस्पिटलमध्ये सोडून पळून गेले आहे. संबंधित व्यक्ती उपचारापूर्वीच मयत झाला असून त्यास मारहाण केल्यामुळे तो मरण पावला असून त्याचा खून झाला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी न्यू थेरगाव हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन, संबंधित मृतदेह ताब्यात घेऊन आरोपींचा तपास सुरू केला. त्यानंतर पोलीस चौकशीत सदर व्यक्तीचा खून हा पैशाच्या व्यवहारातून झाला असल्याचे स्पष्ट झाले असून सहा आरोपींना पोलिसांनी गजाआड केल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली आहे.

भूवल उर्फ मनोज जगदीश मौर्य असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुभम दिलीप वाल्हेकर (वय 27), सागर जगन जाधव (वय 27), कुणाल सुरेश ब्रह्मे (23), सौरभ राजेंद्र वाघमारे (वय 25 ), अक्षय लक्ष्मण पाटील ( वय 20), दिनेश रामेश्वर मस्के (वय 27, सर्व राहणार – चिंचवड, पुणे) या आरोपींना अटक केली आहे. सदर आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना सात दिवस पोलीस कठोरी मंजूर केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मयत मनोज मौर्य यांच्या पत्नी लालमुनी मौर्य यांनी वाकड पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांना न्यू थेरगाव हॉस्पिटल मधील मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर रुग्णांचे नातेवाईक व तेथे हजर असलेल्या स्थानिक नागरिकांकडून चौकशी दरम्यान माहिती मिळाली की, एक परीक्षा (एम एच 14 जीसी 3190 ) यामध्ये दोन व्यक्ती संशयितरित्या मयतास सोडून गेले आहे. त्यानुसार पोलिसांनी सदरची रिक्षा दिनेश मस्के हा आरोपी वापरत असल्याचे समजले आणि त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्यानी गुन्ह्याची कबुली दिली.

त्यांनी सांगितले की, आमचे मालक शुभम वाल्हेकर यांनी त्यांच्याकडील इनोवा कार मधून एका व्यक्तीस वाल्हेकरवाडी येथील साईडच्या पत्रा शेडमध्ये आणले होते. मनोज यांनी शुभम वाल्हेकर यांच्याकडून पेंटिंगच्या कामाकरीता घेतलेले पैसे तो परत देत नव्हता व त्यांचे काम देखील करत नव्हता. या कारणावरून शुभम वाल्हेकर याच्या सोबत असलेले कुणाल भरम व सौरभ वाघमारे यांनी मनोज याचे हातपाय दोरीने बांधले. त्यानंतर आरोपींनी त्यास बेदम मारहाण करत त्याचा खून केला आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments