Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपैठण-संभाजीनगर रोडवर भीषण अपघात; एकाच मृत्यू, तर दोन गंभीर जखमी

पैठण-संभाजीनगर रोडवर भीषण अपघात; एकाच मृत्यू, तर दोन गंभीर जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बिडकिन : पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील फारोळा गावाच्या पुलाजवळ पादचारी महिला व दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना आज दि.२९ रोजी सकाळी ८:३० वाजता घडली असुन पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे तर दुचाकीस्वार पती पत्नी हे गंभीर जखमी झाले आहेत.

मयत पादचारी महिलेचे नाव छाया संजय म्हस्के, वय. ३२ वर्षे.रा. दरेगाव, ह.मु. फारोळा ता. पैठण असे आहे तर दुचाकीवरील मन्वर अन्वर खान पठाण, वय. ४५ वर्षे, व रुबिना मन्वर खान पठाण वय. ३५ वर्षे. दोघेही रा. फारोळा. ता. पैठण असे आहे. आज सकाळी फारोळा गावानजीक असलेल्या एका खासगी कंपनीत कामाला जात असलेल्या या तिघांना अज्ञात वाहनाने धडक दिली असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी पोलिस कर्मचार…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments