Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पेट्रोल पंप बंद राहणार ही अफवाच; असोसिएशनकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण

पेट्रोल पंप बंद राहणार ही अफवाच; असोसिएशनकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई – केंद्र सरकारने नवा कायदा केला असून त्यात वाहनचालकांकडून अपघात झाला तर त्या अपघाताबद्दल चालकाला १० वर्षे शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतुद केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याविरोधात पेट्रोल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइल, एचपीसी एल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे, राज्यातील अनेक जिल्ह्यात टँकर व ट्रक एकाच जागी बसून होत्या. या घटनेचे पडसाद पेट्रोलपंप चालकांवर होत आहेत. त्यातच, राज्यभरात उद्या पेट्रोल पंप बंद राहणार अशी अफवा सर्वत्र पसरली. मात्र, पेट्रोल पंप बंद राहणार नसल्याचं पेट्रोल-डिझेल असोसिएशसने स्पष्ट केले आहे.

टैंकर चालकांच्या संपाला प्रतिसाद देण्यासाठी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरुन टँकर बाहेर पडले नाहीत. तर, काही ठिकाणी पेट्रोलच्या टँकरचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे, उद्या २ जानेवारी पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा सर्वत्र पसरली. त्यात अफवेतून राज्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर नागरिकांनी पेट्रोल भरायला गर्दी केली. तर, पेट्रोल दर कमी होणार असल्याच्या अफवेनेही काही ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी झाली. मात्र, पेट्रोल-डिझेल असोसिशनं प्रेसनोट काढून स्पष्टीकरण दिलं आहे. संपाचा किंवा पेट्रोल पंप बंद ठेवण्याची संघटनेची कुठलीही योजना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्यातील पेट्रोल-डिझेल असोसिएशननं यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकात म्हटलं की, सर्वसामान्य जनतेला आमची विनंती आहे की, कुठल्याही अफवांमुळं किंवा बातम्यांमुळं पॅनिक होऊ नका. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी संघठना बांधिल आहे, असं पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी स्पष्ट केलं.

असोसिएशनचं स्पष्टीकरण

पेट्रोल चालकांच्या संपामुळे पेट्रोलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरुन नागरिकांनी दुपारपासूनच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुण्यासह सर्वच पेट्रोल पंपावर वाहनांचा लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या. ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले की, लोणी काळभोर येथील केंद्रातून पेट्रोलचे टँकर बाहेर पडण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत. कोठेही पेट्रोलची टंचाई नाही. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, अकारण जादा पेट्रोल भरुन घेऊ नये.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments