Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल: पोलिसांची धावपळ, शोधकार्य सुरू

पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल: पोलिसांची धावपळ, शोधकार्य सुरू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील नवी पेठेतील अलका चौकाजवळ पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा दूरध्वनी पोलिसांना आल्यानंतर धावपळ उडाली. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी रुग्णालयाची कसून पाहणी केली असता कोणतीही बॉम्बसदृश वस्तू सापडली नाही आणि संबधित अफवा असल्याचे स्पष्ट झाल्याने मोकळा श्वास पोलिसांनी घेतला.

गुरवारी मध्यरात्री पावणे बारा वाजता पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रुम) आला. या घटनेची माहिती स्थानिक विश्रामबाग पोलीस, तसेच बॉम्ब शोधक पथकाला तातडीने देण्यात आली. बॉम्बच्या अफवेमुळे रुग्णालय परिसरात खळबळ पसरली. बाँब शोधक पथकाने अत्याधुनिक साधनासह परिसराची सखोल तपासणी केली. विविध संशयास्पद वस्तूंची तपासणी केल्यावर कोणतीही बाँबसदृश वस्तू मिळून आली नाही. कोणीतरी खोडसाळपणे पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केल्याची माहिती पोलिसांनी यानंतर दिली. पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करणऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक बालिकेचा मृत्यू

एका भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार महिलेला पाठीमागून धडक दिल्याची घटना लुल्लानगर परिसरात घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तीन वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोषी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शहाबानो सिराज खान (वय 3) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सकीना सिराज खान किरकोळ जखमी झाल्या आहे. टेम्पोचालक नरसिंह कावरे (रा. आंबेगाव, पुणे) याच्याविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सिराज फिरोज खान (वय 39, रा. सत्यम कशिश सोसायटी, कोंढवा, पुणे) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुचाकीस्वार सकीना आणि त्यांची मुलगी शहाबानो लुल्लानगर परिसरातून निघाल्या होत्या. पारशी कॉलनी समोर भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील शहाबानोला गंभीर जखमी झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शहबानोचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक एस गायकवाड पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments