Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजपुरंदर मधील भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा विजय शिवतारे यांना विरोध

पुरंदर मधील भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा विजय शिवतारे यांना विरोध

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बापू मुळीक / सासवड : पुरंदर तालुक्यातील भाजप गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असून, गेल्या दोन निवडणुकांमध्ये आम्ही विजय शिवतारे यांचे प्रामाणिकपणे काम केले. परंतु विजय शिवतारे यांनी आमच्यावर सातत्याने अन्याय केला. त्यामुळे आम्ही विजय शिवतारे यांचे कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये काम करणार नसून तटस्थ राहण्याची भूमिका घेत असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य गिरीश जगताप यांनी स्पष्ट केले.

सासवड (ता. पुरंदर) येथे मूळनिष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते. यावेळी भाजपचे माजी तालुका अध्यक्ष अशोक जोशी, माजी तालुकाध्यक्ष मोहन भैरवकर, सासवडचे शहर माजी अध्यक्ष भगवान पवार, विरेश दहिवले उपस्थित होते.

जगताप पुढे म्हणाले, भाजपच तालुक्यामध्ये सर्वात मोठा पक्ष झाला असून, आमच्या पक्षाला उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. परंतु आमच्या पक्षाला उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर नवख्या कार्यकर्त्यांनी विजय शिवतारे यांना साथ देण्याचे ठरवले. परंतु विजय शिवतारे यांनी स्वर्गीय गिरीश बापट यांच्यावर प्रकट टीका केली असल्याची सल आमच्या मनामध्ये आहे.

तर विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना महादेवाच्या पिंडीवरील विंचू असे, संबोधल्यामुळे भाजपाला याचा राज्यात तोटा झाला. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्याशी जुळते, मिळते घेतले. परंतु त्यांचा उपयोग झाला नाही. असे देखील जगताप यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही प्रचार करणार आहोत, परंतु कोणत्याही परिस्थितीत विजय शिवतारे यांचा प्रचार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पुरंदर तालुक्यातील भाजपच्या निवडक पदाधिकारी यांनी घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments