Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजपुरंदर तालुक्यात सर्व्हर डाऊन; नागरिकांना गहू, तांदूळ मिळणार कधी?

पुरंदर तालुक्यात सर्व्हर डाऊन; नागरिकांना गहू, तांदूळ मिळणार कधी?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सासवड : सर्वसामान्य नागरिकांना मिळणारे शासनाचे गहू, तांदूळ हे सर्व्हरमुळे वेळेवर मिळत नाही. त्यासाठी दिवस-दिवस बसून राहावे लागत आहे. हा सर्रास प्रकार पुरंदर तालुक्यात दिसून येत आहे. यावर शासन काय निर्णय घेणार, सर्वसामान्यांची होणारी हेळसांड कधी थांबणार? वेळेवर गहू, तांदूळ मिळणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये भेडसावत आहे.

या संदर्भात तक्रारी आल्यानंतर चाबळी येथे 50 रेशन कार्डधारकांना आज सर्व्हर अडचणीमुळे खूप वेळ ताटकळत थांबावे लागले. यासाठी पुरंदरच्या पुरवठा विभाग सुधीर बडधे यांच्याशी संवाद साधला, ते म्हणाले नागरिकांना न थांबवता रेशन कार्ड दुकानदाराला गहू, तांदूळ 50 रेशन कार्डधारकांना देण्यास सांगितले.

यासाठी चाबळी येथे आज फक्त चार ते पाच लोकांचे थंब झाल्यामुळे त्यांना व धान्य गहू, तांदूळ पन्नास रेशन कार्डधारकांना देण्यास सांगितले. यामुळे चांबळीतील माजी उपसरपंच संजय कामठे यांनी पुरवठा अधिकारी यांच्या आदेशानुसार हे वाटप केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments