Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजपुरंदर तालुक्यातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आमदारकी मला परत द्या : विजय शिवतारे

पुरंदर तालुक्यातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आमदारकी मला परत द्या : विजय शिवतारे

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सासवड : वाळुंज गावातील शिवसेना शाखा फलक, विविध विकास कामे तसेच तालुक्यातील प्रलंबित प्रश्न, गुंजवणी, विमानतळ, आयटी पार्क अशा विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदारकी मला परत द्या, असं आवाहन विजय शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यातील नागरिकांना केलं आहे. येथील सरदार शिवाजी इंगळे यांचा 376 वा शौर्य दिन सोहळ्यानिमित्त अश्वरुड पुतळ्याच्या जागेचा शुभारंभ कार्यक्रमादरम्यान विजय शिवतारे बोलत होते.

विजय शिवतारे यांच्या हस्ते गावातील भूषण पुरस्कार, शेतकरी, औद्योगिक शिक्षण, मोफत दोन आर क्षेत्र दिलेले, विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शिपाई, पाणीपुरवठा, तलाठी, कोतवाल तसेच सासवड, बेलसर, माळशिरस गणातील पत्रकार असे मिळून 80 जणांचा सन्मान शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवतारे म्हणाले कि, माजी नियोजन समितीचे सदस्य रमेश इंगळे यांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून गावातील व सोशल मीडिया, प्रिंट मीडिया पत्रकारांचा सन्मान केला. मला दहा वर्षात करता आले नाही, ते इंगळे यांनी आदर्श पत्रकार म्हणून गौरवले, ते मला आत्तापर्यंत करता आले नाही. ते तुमच्याकडून शिकायचे आहे. आठ दिवसात प्रिंट मीडिया, सोशल मीडिया पत्रकारांचा सन्मान शिवसेना यांच्या वतीने करणार असल्याचेही यावेळी शिवतारे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments