Thursday, November 7, 2024
Homeक्राईम न्यूजपुन्हा पुण्यात खळबळ ! सलग दुसऱ्या दिवशीही पुणे एअरपोर्टवरील विमानांना उडून देण्याची...

पुन्हा पुण्यात खळबळ ! सलग दुसऱ्या दिवशीही पुणे एअरपोर्टवरील विमानांना उडून देण्याची धमकी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : देशभरातील विविध विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या येण्याची घटना गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशातच आता पुणे इंडिगो एअरलाइनच्या 20 विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ई-मेलवरुन अज्ञाताने धमकी दिली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पुणे एअरपोर्टवरील विमानांना उडवून देण्याची धमकी दिली आहे.

काल गुरुवारी पुणे विमानतळावरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर आज पुन्हा 20 विमानांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. इंडिगो कंपनीसह इतर कंपन्यांना धमकी मिळत असताना हवाई वाहतूक करणा-या विमान कंपन्याचं 600 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

पुणे विमानतळ हाय अलर्टवर असून विमान उडून देण्याच्या धमकी देणा-या अज्ञाताविरोधात विमानतळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवासी विमानांना धमकी येण्याचे सत्र थांबत नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments