Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्याहून कुरिअरने लंडनला तस्करी, एकूण 3474 कोटींचा साठा जप्तः दिल्लीत आणखी 1200...

पुण्याहून कुरिअरने लंडनला तस्करी, एकूण 3474 कोटींचा साठा जप्तः दिल्लीत आणखी 1200 कोटींचे 600 किलो तर सांगलीत 100 कोटींचे 50 किलो एमडी ड्रग्ज जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत छापेमारी करून ६०० किलो एमडी ड्रग्ज जप्त केले असून बाजारात त्याची किंमत १२०० कोटी रुपये आहे. त्याचबरोबर सांगलीतही ५० किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून ते १०० कोटी रुपयांचे आहे.

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीविरोधातील कारवाईत पुणे पोलिसांनी आतापर्यंत पुण्यात ७१७, दिल्लीत ९७० आणि सांगलीतील ५० किलो मिळून एकूण ३,४७४ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दिल्लीत दोन जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या आता ७ झाली आहे. विशेष म्हणजे एमडी हा अमली पदार्थ कुरिअरमार्फत चक्क विमानाने लंडनला पाठवला जात होता, अशी धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे.

कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थ केम लॅबोरेटरी प्रा. लि. कंपनीत मोठ्या प्रमाणात दर्जेदार एमडी उत्पादित होऊन ते बॅरलमध्ये भरून टेम्पोतून रस्तेमार्गे दिल्लीत जात होते.

त्यानंतर दिल्लीतील आरोपी हे कुरिअरच्या माध्यमातून फूड पॅकेटमध्ये एमडी ड्रग वेगवेगळ्या पुड्यात टाकून विमानातून पार्सल करत असल्याची धक्कादायक बाब पोलिस चौकशीत उघडकीस आली आहे. विमानतळावर स्कॅनिंगमधून हे पार्सल कशा प्रकारे अन्न पुरवठ्याच्या नावाखाली पाठवले याबाबत तपास केला जात आहे. पोलिसांनी बुधवारी दिल्लीत १२० स्कवेअर फुट कुरीअर कंपनीच्या गाळयातून आणखी ६०० किलो एमडी जप्त केले आहे तर सांगलीत ५० किलो एमडी हस्तगत करण्यात आले आहे.

दिल्ली येथून दिवेश चिरंजीत भुटिया (३९), संदीप राजपाल कुमार ( ४२, दोघे रा. दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे. तर सांगली येथून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणात कंपनी मालक भिमाजी उर्फ अनिल परशुराम साबळे (४६, रा. पुणे) व केमिकल तज्ञ युवराज ब्रबुवान भुजबळ (४१, रा. डोंबवली, मुंबई) यांना न्यायालयात हजर केले असता २९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ‘न्यू पुणे जॉब’ एमडीला कंपनीत नाव : कुरकुंभ येथील कंपनीत एमडी ड्रग उत्पादन मोठया प्रमाणात करण्यात येत होते. परंतु कंपनीतील कामगारांना या मालाबाबत कल्पना नव्हती. कंपनी मालक भिमाजी साबळे याने या उत्पादनास ‘न्यू पुणे जॉब’ असे नाव ठेवले होते. त्याकरिता लागणारा कच्चा माल हा कंपनीच्या इतर उत्पादन निर्मिती मालासोबत लायसन्सवर आणला जात होता.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments