इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्याराजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील नेते मंडळी महायुतीमधील अनेक पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर जोरदार सुरू असताना आता साताऱ्यामध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. राज्याचे माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील- उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील- उंडाळकर हे काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या कोयना बँकेत पोचले आहेत. या ठिकाणी उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यानंतर आता साताऱ्यात ही काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
दरम्यान उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या चर्चेमुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यावर सध्या काँग्रेसने सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. परंतु आता ते काँग्रेसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीची त साताऱ्यात आणखीनच वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.