Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज पुण्यात DJ चा दणदणाट भोवला; मिरवणुकीतील ६० गणेश मंडळांवर होणार ध्वनी प्रदुषणाचे...

पुण्यात DJ चा दणदणाट भोवला; मिरवणुकीतील ६० गणेश मंडळांवर होणार ध्वनी प्रदुषणाचे गुन्हे दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टिमचा वापर करुन आवाजाची मर्यादा ओलांडलेल्या मुख्य मिरवणुकीतील किमान ६० मंडळांवर ध्वनी प्रदुषणाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. असा अहवाल या पोलीस ठाण्यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे पाठविला आहे. अगोदर होणाऱ्या उपनगरातील विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात चंदननगरमधील विनायक तरुण मित्र मंडळाच्या स्पिकरचा आवाज सर्वाधिक ११९.५ डेसिबल नोंदविला गेला होता.

लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड आणि टिळक रोड या चार प्रमुख रस्त्यांवरुन मुख्य गणेश विसर्जन मिरवणुक निघते. फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हे चारही रस्ते येतात. विसर्जन मिरवणुकीत विहीत आवाजाचे पातळीचा डेसिबलचा भंग करुन कर्णकर्कश आवाजात डिजे साऊड सिस्टिम लावून लोकांना त्रास देणाऱ्या मंडळांवर या पोलीस ठाण्यातील पोलीस पथक लक्ष ठेवून होते. अशा मंडळांना सूचना दिल्यानंतरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पोलिसांनी नॉईज लेव्हल मीटर पथकाला बोलावून मिरवणुकीत चालू असलेल्या डिजे साऊंडची तीव्रता मोजली. क्षमतेपेक्षा अधिक तीव्रता आढळून आलेल्या मंडळाचे अध्यक्ष व डीजे चालक यांच्याकडे त्याची प्रिंट दिली. अनेकांनी त्यावर सही करण्यास नकार दिला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने पोलिसांनी त्यावेळी कारवाई केली नाही. त्यानंतर आता त्याचा अहवाल तयार करुन ‘तो’ ‘प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्या आली आहे.

फरासखाना पोलीस ठाण्याने विसर्जन मिरवणुकीतील २० आणि ईद मिरवणुकीतील २ असे २२ अहवाल तयार केले आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्याने १० आणि खडक पोलीस ठाण्याने २५ अहवाल तयार करुन ते प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे पाठविले आहेत. याशिवाय कोथरुड, चंदननगर, येरवडा, हडपसर, वानवडी, विमानतळ, कोथरुड पोलिसांनी वेगवेगळ्या गणेश मंडळांचे अध्यक्ष व डिजे चालकावर गुन्हे दाखल केले आहेत.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments